‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’
कार्ल मार्क्सने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी म्हटले होते की, बाजारपेठ ही विनिमय व नियमनाची बाब आहे, पण जेव्हा बाजारपेठ हे जीवनाचे तत्त्वज्ञान होते आणि ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’, म्हणजे खासगी संपत्ती हेच सर्व मानवी व्यवहाराचे ‘चलन’ होते, तेव्हा समाजच रानटी स्थितीत जातो. त्या रानटी स्थितीतून समाज बाहेर पडत गेला तेव्हा नैतिकता आणि सांस्कृतिकता जन्माला आली. त्या प्रवासातच साहित्य-संगीत-कला …